अलिबाग जेट्टीजवळ मासेमारी नौका बुडाली

अलिबाग जेटी जवळ मासेमार नौका बुडाली
7 लाखांचे नुकसान
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग कोळीवाडा येथील समुद्रात जेटी जवळ नांगरून ठेवलेली मासेमार नौका समुद्राच्या पाण्याच्या लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे खडकांवर आदळून पाण्यात बुडाली. या घटनेमुळे मच्छीमार नोकेच्या मालकांचे सुमारे 7 लाखांचे नुकसान झाले आहे.

आज मंगळवारी संतोष किसन कुलाबकर यांची सागर कृपा ही आयएनडी 3 एम एम 240 ही नौका अलिबाग येथील समुद्रात जेटी जवळ नांगरून ठेवली होती. दुपारी 1 च्या सुमारास लाटांच्या जोरदार तडाख्यामुळे नांगराचा दोर तुटून खडकावर जोर जोरात आदळू लागली. त्यामुळे काही वेळातच फुटून समुद्राचे पाणी आत शिरल्याने ती बुडू लागली. ही गोष्ट समजताच कोळीवाड्यातील अनेकांनी जेटी कडे धाव घेतली मात्र बोट वाचवणे कोणालाच शक्य झाले नाही. सदरचे वृत्त समजताच मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकारी श्रीमती आंबुलकर तसेच अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार हंबीरराव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

आधीच विविध संकटाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मासेमार कुटुंबाला शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

Exit mobile version