| माणगाव | प्रतिनिधी |
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार, दि.15 ऑगस्ट रोजी माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव याठिकाणी माणगाव काळ नदीत बोटिंगमधून रॅली काढण्यात आली. साळुंखे रेस्क्यू टीमच्या माणगावमधील एसआरटी पथकाच्या जवानांनी जुने माणगाव येथील हॉटेल मयूरजवळील पाणवठा येथून काळ नदीत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बोटिंगमधून रॅली काढली.
माणगावसह तालुक्यात सर्वत्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत असतानाच माणगावमधील एसआरटी पथकाच्या रेस्क्यू टीमच्या जवानांनी एकत्रित येत मान्यवरांना निमंत्रित करून बोटिंगमधून प्रथमच रॅली काढली. यावेळी साळुंखे रेस्क्यू टीमचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी आपल्या टीमबद्दल उपस्थित मान्यवर व नागरिकांना माहिती दिली.|
या कार्यक्रमास तालुक्याचे उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक प्रशांत साबळे, स्वीकृत नगरसेवक हेमंत चंद्रकांत शेट, माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बामगुडे, आर.डी. साळवी, पोलीस कॉन्स्टेबल एस.बी. सुरवसे, संतोष सुगरे, स्वप्नाली शिंदे, बाळा मांजरे, साळवी मॅडम, सुमित सूर्यकांत काळे, संजय मालोरे, सचिन गोरेगावकर यांच्यासह एसआरटी पथकाचे जवान सरफराज अफवारे, इमरान धवलालकर, शादाब गैबी, रवींद्र भिकू मोरे, इरफान हाजीते, रफिक जामदार, फहीम वाडेकर, अमित, सागर, श्वेता पाटील, धनश्री उभारे, एसआरटी पथक महाड आदींसह जुने माणगाव ग्रामस्थ उपस्थित होते.