। अलिबाग | प्रतिनिधी |
करंजा येथून मासेमारीसाठी निघालेल्या मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीच्या तुळजाई नावाच्या बोटीला शनिवारी (दि. 26) खांदेरी किल्ल्यानजीकच्या समुद्रात कलंडून जलसमाधी मिळाली होती. या बोटीतील आठ जणांपैकी पाच जण सुखरूप असून तीन जण बेपत्ता झाले होते. बेपत्ता असलेल्या तीन खलाश्यांचा ड्रोनच्या मदतीने किनाऱ्याजवळ शोध सुरु होता. अखेर सोमवारी (दि. 28) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास तीन बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह सापडले. त्या तिघांपैकी दोघांचे मृतहेद दिघोडे आणि एकाचा मृतदेह किहीम किनारी आढळून आला आहे. नरेश राम शेलार, धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील अशी मृतांची नावे असून याबाबत पुढील कार्यवाही मांडवा सागरी पोलीसांमार्फत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.







