पनवेल परिसरात आढळला मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहर परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

सदर इसमाचे अंदाजे वय 65 ते 70 वर्षे, रंग सावळा, उंची 5 फूट, चेहरा उभट, अंगाने सडपातळ असून, डोक्याचे व दाढीचे केस काळे पांढरे व वाढलले आहेत. तसेच कपाळ मोठे, नाक सरळ आहे. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले 9702027362 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version