| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या इसमाचे अंदाजे वय 55 वर्षे, रंग काळा सावळा, उंची अंदाजे साडेपाच फुट, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, डोक्याचे केस काळे पांढरे व वाढलेले, कपाळ रुंद, नाक सरळ असून अंगात चेक्स रंगाचा शर्ट व निळ्या पांढर्या रंगाची बरमुडा घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे (27452333) किंवा पो. उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे (9823047161) येथे संपर्क साधावा.