। पनवेल । वार्ताहर ।
शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, चेहरा उभट, मिशी व दाढी वाढलेली काळी व बारीक, उंची 5 फूट 5 इंच, रंग सावळा असून, अंगात सफेद कपडा गुंडाळलेला आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधावा.