। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली पोलीस ठाण्याच्या पाठीमागील गेटसमोर मुंब्रा-पनवेल महामार्गावरी पुलाखाली एका व्यक्तिचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध कळंबोली पोलीस करीत आहेत. मृत व्यक्तिचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, रंगाने सावळा, बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे असून, अंगात काळ्या रंगाचा फुल शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट आहे. या व्यक्तिबाबत कोणाला अधिक माहिती मिळाल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे किंवा सपोनि वैभव नन्नवरे (9637076949) येथे संपर्क साधावा.