| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या व्यक्तीचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे असून रंग सावळा, उंची अंदाजे 5 फुट – 5 इंच, चेहरा उभट, अंगाने मध्यम, डोक्याचे केस काळे, दाढी वाढलेली, मिशीचे केस काळे वाढलेले, अंगात नेसुन मळकट चॉकलेटी रंगाचा फुलबाह्याचा शर्ट, निळ्या रंगाची मळकट जिन्स पॅन्ट घातलेली आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उप निरीक्षक अनंत परांगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






