| पनवेल | वार्ताहर |
उलवे परिसरात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून, तिच्या नातेवाईकांचा शोध उलवे पोलीस करीत आहेत. या महिलेचे अंदाजे वय 70 वर्षे असून, केस अर्धवट काळे पांढरे, बांधा सड पातळ, रंग काला, उंची अंदाजे 4 फूट असून अंगात गुलाबी रंगाचा मध्ये निळ्या रंगाची नक्षी असलेला गाऊन, डोक्या खाली निळसर गुलाबी रंगाची ओढणी आहे. तसेच, दोन्ही हातात लोखंडी कडा आहे. या वृद्ध महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उलवा पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक आशुतोष देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







