385 कोटींच्या जीएसटीच्या बोगस पावत्या

उरण | वार्ताहर |
70 कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कराचा समावेश असलेल्या बनावट इनपूट टॅक्स मिळविण्यासाठी 385 कोटींच्या बोगस पावत्या करणार्‍या नवी मुंबई जीएसटीने दोन व्यापार्‍यांना अटक केली आहे.
या मध्ये 14 पेक्षा अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे.त्याचबरोबर याचे जाळे संपूर्ण मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये पसरल्याचे निष्पंन्न झाले आहे.त्यामूळे या करचुकवेगिरी च्या घोटाळ्या मध्ये सहभागी असलेल्या आणखी काही कंपन्याच्या चालक व मालकांचा शोध नवी मुंबई सीजीएसटी कडून घेतला जात आहे.
या प्रकरणी मेसर्स श्री बिटुमॅक्स ट्रेडिंगचा मालक व मेसर्स ओम्निपोटेंट इंडस्ट्रीज लिमिटेडचा संचालक या दोघांना सीजीएसटीच्या अधिकार्‍यांनी सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132 चे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सीजीएसटीच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाने नवी मुंबई सीजीएसटीला खबर दिली.कि,काही कंपन्यां बोगस पावत्यांद्वारे वस्तु व सेवा कराचा समावेश असलेले बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून कोट्यावधी रुपयांची सीजीएसटीची लुट करत आहेत. तपासणी केली असता, मेसर्स ओम्निपोटेंट इंडस्ट्रीज लि. व मेसर्स बिटू मॅक्स ट्रेडिंग या दोन कंपन्यांनी अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून बोगस पावतीद्वारे ,बिटुमेन, ऍस्फाल्ट, ऑइल शेल आणि टार सँड यासारख्या वस्तुंची खरेदी- विक्री करत असल्याचे आढळुन आले.

Exit mobile version