। मुंबई । प्रतिनिधी ।
सुरक्षेची जबाबदारी चोख बजावणारे मुंबई पोलीस सध्या गणेशोत्सवाच्या सुरक्षेत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. यावेळी मानवी बॉम्ब बाबतची धमकी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर प्राप्त झाली आहे. 34 वाहनांमध्ये मानवी बॉम्ब व 400 किलो आरडीएक्सचा उल्लेख या संदेशात करण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
तब्बल 34 गाड्यांमध्ये ह्यूमन बॉम्ब लावण्यात आले आहेत आणि स्फोटानंतर संपूर्ण मुंबई हादरून जाईल. या संदेशामध्ये ‘लश्कर-ए-जिहादी’ या संघटनेचे नावही घेतले गेले असून 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत, असा दावा धमकीच्या संदेशात करण्यात आला आहे. 400 किलो आरडीएक्सच्या स्फोटामुळे तब्बल एक कोटी नागरिकांचा बळी जाईल. या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती दिली. तसेच सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
मोठी बातमी! उद्या मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
