मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईतील एका नामांकित शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कांदिवलीतील स्वामी विवेकानंद शाळेत शुक्रवारी (दि. 18) सकाळी ईमेलद्वारे अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली. शाळा प्रशासनाने तात्काळ कांदिवली पोलिसांना याबाबत माहिती दिली असता कांदिवली पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शाळा आणि शाळेच्या परिसरात तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू अद्याप आढळून आली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या धमकीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version