कोरोना काळात सुद्धा ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
। नागोठणे । वार्ताहर ।
कोरोना काळातही नागोठणे शहरातील नागरिकांसाठी जिवाची पर्वा न करता सेवा बजावणार्या नागोठणे ग्रामपंचायत मधील आपल्या कर्मचार्यांना वेळेच्या आधी दिवाळी बोनसचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ.मिलिंद धात्रक, उपसरपंच मोहन नागोठणेकर व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.25) राबविण्यात आला.
नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयातील कै. शैलेंद्र देशपांडे सभागृहात दिवाळी निमित्ताने सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान अर्थात दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, अखलाक पानसरे, अतुल काळे, सदस्या दिलनवाझ आधिकारी, भक्ती जाधव, रोजीना बागवान, माधवी महाडिक, मंगी कातकरी, मेघा कोळी तसेच ग्रामसेवक राकेश टेमघरे आदींसह नागोठणे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना काळात सुद्धा ग्रामपंचायत हद्दित मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून गावाचा विकास योग्य पद्धतीने सुरु आहे. असे असतानाच या विकासात काही प्रमाणात का होईना सहभाग असणार्या ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गाला दिवाळी बोनसचे वाटप करुन आम्हा कर्मचार्यांचा आनंद द्विगुणीत करणारे नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यांचे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाच्या वतीने आभार व्यैम करीत असल्याचे यावेळी ग्रामपंचायतीचे कार्यालयीन निरीक्षक प्रमोद चोगले यांनी सांगितले.






