शेकापच्या प्रयत्नांमुळे शेतकर्‍यांना बोनस

आ. जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील शेतकर्‍यांनी पनवेल तालुका सहकारी भात खरेदी केंद्रावर आपले रजिस्ट्रेशन केले होते. महाराष्ट्र शासनाच्या लिमिटनुसार 80 टक्के शेतकर्‍यांचे भात या केंद्रावर खरेदी केले होते. त्यामुळे त्यातील काही शेतकर्‍यांचे भात खरेदी करता आले नाही. अशा सर्व शेतकर्‍यांना मोबदला म्हणून शासनाने बोनस स्वरूपात भरपाई द्यावी, यासाठी आ. जयंत पाटील यांनी शासनाकडे वारंवार हा प्रश्‍न लावून धरला होता. दरम्यान त्यांच्या मागणील यश आले असून, शेतकर्‍यांना बोनस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे.


दरम्यान, याबाबत शेकापचे पनवेल भात गिरणीचे माजी चेअरमन यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पनवेल तालुक्यात एकूण 2070 शेतकर्‍यांनी भात खरेदीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी 80 टक्के शेतकर्‍यांचा भात या केंद्रावर खरेदी केले होते. उर्वरित शेतकर्‍यांचे भात खरेदी न झाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले होते. याबाबत पनवेल भात गिरणीचे माजी चेअरमन मनोहर भोईर यांनी दि. 29 जानेवारी रोजी तहसीलदार पनवेल यांना लेखी निवेदन दिले होते. तसेच याबाबत त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्याला यश आले आहे. पनवेलमधील 367 शेतकर्‍यांना त्याचा लाभ झाला असून, त्यांचा बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा झाली आहे. यामुळे भरत पवार (मोहपे) आणि सुरेश भोईर (भाताण) यांनी आ. जयंत पाटील, पनवेल भात गिरणी चेअरमन रवींद्र भोईर, माजी चेअरमन मनोहर पाटील यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version