अलिबागमध्ये भऱणार ग्रंथोत्सव; तरुणांसाठी होणार विशेष सत्र

| अलिबाग | वार्ताहर |

जिल्ह्यात दि.14 व दि.15 डोंगरे वाचनालय सभागृह येथे होणार्‍या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.

यावेळी सुप्रसिद्ध लेखक-साहित्यिक रविंद्र तांबोळी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सुजाता पाटील, साहित्यिका श्रुती देसाई, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उपशिक्षणाधिकारी श्री.संतोष शेडगे, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावर्षीच्या ग्रंथोत्सवात आबालवृद्धांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्यासाठी नाविन्यपूर्ण सत्र आयोजित करावेत, तरुण वर्गासाठी विशेष सत्रांचे आयोजन करावे, या ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांच्या विषयांबाबत नागरिकांकडूनही सूचना मागवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी उपस्थितांना दिल्या. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार – 9404105005 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version