पणजी | प्रतिनिधी |
केंद्रीय माहिती आयुक्त आणि प्रख्यात लेखक उदय माहुरकर आणि सहलेखक चिरायू पंडित यांनी ऐतिहासिक पुराव्यांसह सावरकरांच्या जीवनावर नवीन प्रकाश टाकणारे पुस्तक ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रीव्हेंटेड पार्टिशन’ लिहिले आहे. या पुस्तकाचा गोव्यातील प्रकाशन सोहळा रविवारी, 9 जानेवारीला करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पणजी येथील एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला म्हापसा, गोवा येथील ङ्गस्वराज्य संघटनेफचे अध्यक्ष प्रशांत वाळके आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांचीही उपस्थिती होती. ङ्गया प्रकाशन सोहळ्याला तपोभूमी कुंडई येथील प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी, मुख्य अतिथी म्हणून मुंबई येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे उपस्थित रहाणार आहेत. गोवा विद्यापीठ, ‘केमिकल सायन्स’चे सभागृह, तालिगाव, गोवा. येथे दुपारी 4.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.