पनवेलमध्ये बुस्टर डोस लसीकरण

vaccine beneficiary, Amit Sonawane, getting his shot.

| पनवेल । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारने दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांनी 75 दिवस पूर्ण केले असतील त्यांना 15 जुलैपासून विनामूल्य बूस्टर डोस देण्याचे निश्‍चित केले आहे. महापालिका क्षेत्रात 28 लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागाकरिता फिरती लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवरती बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहेत. महापालिका क्षेत्रात प्रिकॉशन डोससाठी कोविशिल्ड डोसचे पाच लाख एक हजार 510 व कोवॅक्सीनचे 96 हजार 333 लाभार्थी आहेत. या दृष्टीने पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नियोजन केले आहे. महापालिका क्षेत्रात पुरेशा प्रमाणात कोविशिल्ड लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी कोरोना लसीकरणाचे कवच आवश्यक आहे; तरी लाभार्थ्यांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

Exit mobile version