बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; तिघे संशयित ताब्यात

। पुणे । प्रतिनिधी ।

बोपदेव घाटातील तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या तिघांची सखोल चौकशी सुरु आहे.

पुण्यातील बोपदेव घाटात रात्री फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणी आणि तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला. यावेळी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत त्याला मारहाण करण्यात आली. तसेच त्या तरुणाचा शर्ट काढून त्याचे हातपाय बांधण्यात आले. यानंतर तीन आरोपींनी 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. गेल्या काही दिवसांपासून या घटनेची सखोल चौकशी सुरु होती. आता अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्यांची सखोल चौकशी सुरु आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 60 टीम तयार केल्या होत्या. मात्र घटनेच्या 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच काढले आणि कोंढवा पोलिसांकडून ते प्रसिद्ध करण्यात आले. याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधावा असे पोलिसांनी आवाहन केले होते. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
Exit mobile version