बोरिंग मारुन पाण्याची समस्या सोडवणार

| पनवेल | वार्ताहर |

महानगर पालिका क्षेत्रात सिडको नोडमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कामोठे सेक्टर 35 येथील सोसायटीने बोरिंग मारण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन मैलाचा प्रवास करावा लागत आहे. तसेच गुरा-ढोरांच्या पाण्याची देखील त्यांना व्यवस्था करावी लागत आहे. सध्या ग्रामीण भागापासून शहरापर्यंत असेच विदारक चित्र पहायला मिळत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात देखील पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी सर्वांचीच दमछाक होत आहे. यावर उपाय म्हणून सोसायटीने त्यांच्याच आवारात बोरिंग मारण्याला सुरुवात केली आहे. या ठिकाणी पाणी लागले, तर नागरिकांची पाण्याची सोय होणार आहे. विशेष करुन महिलांचे पाण्यावाचून होणारे हाल थांबणार आहेत.

Exit mobile version