बोरगाव शाळा व नेने कन्या विद्यालयांची बाजी

| खरोशी | वार्ताहर |

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमा अंतर्गत पेण तालुक्यातील सर्व शाळा सहभाग घेतला होता सदर उपक्रमा अंतर्गत शाळांची निवड करणे अपेक्षित असल्याने पेण तालुक्यांतील मुल्याकंन समिती सर्व केंद्र स्तर मुल्याकंन समिती, तालुकास्तर मुल्याकंन समितीने 11 गटातून 38 गाळाची अ गट आणि ब गट निरीक्षण करून शाळांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये ‘अ’ गट जिल्हा परिषद, नपरिषद शाळा शासकीय आश्रमशाळा यामध्ये रा.जि.प. शाळा बोरगाव (प्रथम) रा.जि.प शाळा खरोशी (द्वितीय), रा.जि.प शाळा बळवली (तृतीय) तर गट ‘ब’ यामध्ये खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा येतात या शाळांमधून सौ.म.ना. नेने कन्या विदयालय पेण (प्रथम), मुक्ताई विद्यामंदिर हेटवणे वसाहत(द्वितीय), तर ब.ग. ठाकुर विदयालय वढाव (तृतीय) असे नंबर आल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी पेण यांनी दिली. या शाळांची निवड झाल्याने शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version