बोर्ली मांडला विभागातील मांडला पूल गेला वाहून; साळव तपासणी नाक्याजवळ दरड कोसळली

| अलिबाग । प्रतिनिधी ।
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हजेरी लावत पावसाने मुरुड तालुक्यात धिंगाणा घातला. गेले काही दिवस रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. काही ठिकानी उघडीप करणाऱ्या पावसाने सोमवारी रात्री मुरुड तालुक्यांत धिंगाणा घातला. रात्री अचानक ढगफुटी झाल्याने अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गावात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा बो-या वाजला तर, वाहतुकीचेही तीन-तेरा वाजले. पावसामुळे बोर्ली मांडला विभागातील मांडला पूल गेला वाहून गेला. काशीद पुलाच्या जोडरस्त्यावरून पाणी वाहून गेले. साळव तपासणी नाका येथे रात्री दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. महसूल व पोलिस यंत्रणा, JSW कंपनी यांच्या सहकार्याने साळाव-मुरूड आणि साळाव-रोहा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. मुरुड तालुक्यातील मुरुड शहर, मांडला, बोर्ली, चोरढे, माजगाव, खारीक वाडा, खारदोडकुले या गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता पाणी ओसरले असून, पाऊसही थांबला आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सजग आहे.

Exit mobile version