बोर्लीपंचतन पोस्ट कार्यालयाच्या स्पीडला ब्रेक

बंद मुळे स्पीड पोस्ट व रजिस्टर सेवा ठप्प

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

केंद्र शासनाच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट नावाने चालविल्या जाणाऱ्या डाक विभागाच्या विविध सुविधांचा लाभ शहरापासून ग्रामीण भागातील नागरिक घेत असतात.आज खाजगी कुरिअर कंपन्यांची पोस्ट विभागाजवळ स्पर्धा असतानासुद्धा नागरिक पोस्टाच्या सेवेवर जास्त विश्वास ठेवतात. परंतु श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील पोस्टऑफिसचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट 13नोव्हेंबर पासून बंद असल्याने पोस्टाची स्पीड पोस्ट व रजिस्टर सेवा ठप्प झाली आहे. त्याचबरोबर विविध शासकीय कामासाठी लागणारे एक रुपया किमतीचे रेव्हन्यू स्टॅम्प सुद्धा कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

बोर्लीपंचतन हा तालुक्याचा मध्यवर्ती भाग असून विविध बँंका,पतसंस्था,शाळा, शासकीय आणि खाजगी कार्यालयाबरोरच व्यापारी मोठ्या प्रमाणात पोस्टाच्या रजिस्टर,स्पीड पोस्ट अशा विविध सेवांवर अवलंबून असतात.परंतू अभावी पोस्टाच्या ग्राहकांची होणारी गैरसोय याकडे डाक विभागाच्या वरीष्ठांनी केलेल्या दुर्लक्षामुळे नागरीकांकडून पोस्टाच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त होत असून वरीष्ठांनी तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन बोर्लीपंचतन पोस्ट कार्यालयाची सेवा सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.

माणगाव कार्यालयातील वरीष्ठांजवळ चर्चा करुन या समस्येबाबत लेखी कळवले.आणि तातडीने दुरुस्तीसाठी पाठवला.परंतू दिवाळी सुट्टीमुळे कर्मचारी उपस्थित नसल्याने दुरुस्तीला वेळ गेला. दुरुस्त करुन आल्यावरसुध्दा तो चालू होत नसल्याने तो पुन्हा माणगाव कार्यालयात पाठवला आहे.

हिना वाणी, सब पोस्ट मास्तर बोर्लीपंचतन
Exit mobile version