गृहकर्ज वित्तसंस्थांच्या अरेरावीने कर्जदार वैतागले

| नेरळ | प्रतिनिधी |
गृहकर्ज देणार्‍या कंपन्यांकडून कोरोना काळात सातत्याने कर्जदारांची छळवणूक सुरू होती.तोच प्रकार आजही सुरू असून गृह कर्ज देणार्‍या वित्त संस्थांच्या अरेरावीमुळे कर्जदार कंटाळले आहेत.त्या सर्व कर्जदारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कैफियत मांडली आहे.दरम्यान,मनसेचे जिल्हा अध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांनी कर्जदारांना धीर दिला असून लवकरच मनसेच्या माध्यमातून त्या वित्त संस्थांना समज दिली जाईल असे जाहीर आश्‍वासन देण्यात आले आहे.

नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरणमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू आहे.त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या इमारती मध्ये राहणारे रहिवासी यांनी वित्तसंस्था आणि बँकांकडून कर्ज घेतले आहे.त्या वित्तसंस्था यांनी आता कर्जदारांना जगणे मुश्किल करून ठेवले आहे.कोरोना काळापेक्षा अधिक त्रास या वित्तसंस्था कर्जदारांना देत असून मानसिक छळ सुरू असल्याने कर्जदारांना आपली कैफियत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मांडली.फायनान्स कंपन्यांच्या हप्ते वसुली त्रासाला कंटाळलेल्या कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी यांनी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची भेट घेतली.त्यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर,उपाध्यक्ष यशवंत भवारे तसेच विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष सतीश कालेकर,विनोद शेंडे,नेरळ शहर अध्यक्ष हेमंत चव्हाण, दहिवली पं.स.विभाग अध्यक्ष मंगेश गोमारे, सतीश जाधव,उमरोली उपाध्यक्ष मनोज ठाणगे आदी उपस्थित होते.यावेळी कर्जदार मनसेचे कोल्हारे विभागाचे कार्यकर्ते मंगेश गोमारे आणि जाधव यांनी त्या सर्व कर्जदार यांना मनसे कार्यालयात आणले होते.

मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि तालुका अध्यक्ष महेंद्र निगूडकर यांनी संबधित कर्जदार यांची कैफियत ऐकून घेतल्यावर फायनान्स कंपन्यांच्या अधिकार्‍यांशी तत्काळ चर्चा केली.त्यावेळी जिल्हा अध्यक्ष पाटील यांनी वित्तसंस्थांनी हफ्ते वसुलीसाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करण्याच्या सूचना केल्या.जर जबरदस्तीने हफ्ते वसुली करताना कोणत्याही कर्जदाराने आत्महत्या केल्यास त्याविरुद्ध मनसे स्टाईल ने दणका दिला जाईल याचा इशारा संबधित फायनान्स कंपन्यांना दिला आहे.मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे वित्तसंस्था नमल्या असून कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version