| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू आहेत. त्यानूसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व अभ्यागतांना चेहऱ्यावर मास्क परिधान करणे तसेच कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेले असणाऱ्यांनाच कार्यालयात प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यानूसार महापालिकेच्या कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्व अभ्यांगतांना लसीचे दोन डोस पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र प्रवेशद्वारावर पडताळणी करूनच प्रवेश देण्यात येत आहे. तसे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी सुरक्षा विभागास दिले असून याची गांभीर्याने नोंद घेयास सांगितले आहे.