फिरकीपटू ब्रॅड हॉजकडून मुंबई इंडियन्सला गोलंदाजीचे धडे

| मुंबई | प्रतिनिधी |
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पाच वेळच्या विजेत्या मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला. या सामन्यात मुंबईची गोलंदाजी कमकुवत आणि दुबळी जाणवली. मुंबईचा पुढील सामना चेन्नईच्या विरोधात आहे. त्यापूर्वी नेट्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉज याने मुंबईच्या गोलंदाजांना गोलंदाजीचे धडे दिले आहेत.

ब्रॅड हॉज याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना फिरकीचे धडे दिले. मुंबईचे डावखुरा कुमार कार्तिकेय आणि राघव गोयल यांवा गोलंदाजीचे धडे दिले. यावेळी राघव आणि कार्तिकेय यांनी ब्रॅड हॉजसोबतचा आपला अनुभव व्यक्त केला. ब्रॅड हॉजकडून खूप काही शिकता आले, अशी प्रतिक्रिया दोन्ही गोलंदाजांनी दिली. डावखुर्‍या फिरकीच्या काही टिप्स देण्यासाठी आलोय, असे ब्रॅड हॉज म्हणाला. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ब्रॅड हॉज याने यावेळी राघव आणि कार्तिकेय यांच्या गौलंदाजीचे कौतुक केले.

8 एप्रिल रोजी मुंबई वानखेडे मैदानावर चेन्नईसोबत दोन हात करणार आहे. मुंबई पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल. तर चेन्नई विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चेन्नईविरोधात होणार्‍या सामन्यापूर्वी मुंबईच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी कसून सराव केला. ब्रॅड हॉज याने ऑस्ट्रलियासाठी सात कसोटी सामन्यात 17 बळी तर एकदिवसीय सामन्यात ब्रॅड हॉज याने 156 बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये 23 बळी घेतले आहेत.

Exit mobile version