। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बॉक्सिंग या खेळाला बुधवारी जबरदस्त धक्का बसला. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव आणि बॉक्सिंग सामन्यांचा संदर्भ व निकाल यामधील साशंकता हे कारण पुढे करीत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेची मान्यता काढून घेतली.
तसेच, गेल्या वर्षी आयबीएचे रशियन अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी आयओसीतील कर्मचार्यांबद्दल हिंसक आणि धमकावणारी भाषा वापरल्याचा आरोपही केला होता. क्रीडा लवादाने मंगळवारी आयओसीच्या निर्णयाचे समर्थन केले, त्यामुळे आता बॉक्सिंग या खेळाचे ऑलिंपिंकमधील अस्तित्व धोक्यात आले आहे. 2025पर्यंत नवीन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना स्थापन करण्यात अपयश आल्यास 2028मधील लॉस एंजिलिस ऑलिंपिकमधून बॉक्सिंग हा खेळ बाहेर फेकला जाणार आहे.
यावेळी आयबीएकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येऊ शकते. आयओसी व क्रीडा लवादाच्या निर्णयाविरोधात ते स्वीस सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहे. तसेच, पक्षपाती निर्णय असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.