बोर्ड परीक्षेवर शिक्षकांचा बहिष्कार

मागण्या तात्काळ मान्य करा; प्रा. कुलकर्णी
। माखजन । वृत्तसंस्था ।

महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित काम करत असलेल्या शिक्षकांचे प्रश्‍न अद्याप प्रलंबित असल्याने संबंधित शिक्षकांनी फेब्रुवारी/मार्च 2022 च्या दहावी, बारावी बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. शिक्षकांच्या मागण्या तात्काळ मान्य करा, अशी आग्रही मागणी प्रा. दीपक कुलकर्णी यांनी केली आहे.
यासंबंधीचे निवेदन शिक्षक समन्वय संघातर्फे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले आहे. यामुळे परीक्षा मंडळाच्या कामकाजावर परिणाम होण्याची चिन्ह आहेत.
राज्यात विनाअनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या 60 टक्के आहे, त्यामुळे बोर्डाच्या कामकाजात या शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षकांचे मूलभूत प्रश्‍न शासन सोडवत नसल्याने दुर्दैवाने व नाईलाजास्तव बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे शिक्षक समन्वयक प्रा. दीपक कुलकर्णी यांनी सांगितले. राज्यात स्थानिक पातळीवर शिक्षकानी प्रत्येक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात बहिष्काराचे पत्र संबंधित मुख्याध्यापकांना व विभागीय परीक्षा विभागाना दिले असल्याचे प्रा. दीपक कुलकर्णी यांनी माध्यमाना सांगितले.

Exit mobile version