। उरण । प्रतिनिधी ।
द बॉडी शॉप हा प्रतिष्ठित ब्रिटीश निर्मित आंतरराष्ट्रीय एथिकल ब्युटी ब्रँड मुंबईतील पॅलेडियम मॉलमधील आपल्या अॅक्टिव्हीस्ट वर्कशॉप स्टोअरमध्ये आता दृष्टिदोष असलेल्या ग्राहकांना सर्वोत्तम शॉपिंग अनुभव देण्यासाठी ब्रेल वैशिष्ट्ये सादर करत भारतात आपला 18वा वर्धापन दिन साजरा करत आहे. द बॉडी शॉपचा हा अद्वितीय नाविन्यपूर्ण पुढाकार देशभरातील त्यांच्या स्टोअर्समध्ये टप्प्याटप्प्याने घेतलेल्या दृष्टिकोनाचा भाग असेल, जो ब्रँडच्या सर्वसमावेशकता व उपलब्धतेप्रती सुरू असलेल्या प्रयत्नांमधील मोठा टप्पा आहे.
डिसॅबिलिटी राइट्स अॅक्टिव्हीस्ट व युथ कलेक्टिव्ह कौन्सिल (वायसीसी) सदस्य विराली मोदी यांच्या सल्ल्यामधून प्रेरित ब्रेल वैशिष्ट्यांमध्ये स्टोअरमधील कॅटेगरी कॉल-आऊट्सचा समावेश आहे, ज्यामधून सर्वांगीण सर्वसमावेशक शॉपिंग अनुभव मिळतो. द बॉडी शॉपच्या व्यवसाय धोरणांमध्ये भारतातील उदयोन्मुख चेंजमेकर्सच्या मतांना समाविष्ट करण्यासाठी ऑगस्ट 2023 मध्ये वायसीसीची स्थापना करण्यात आली, ज्याद्वारे अधिक युवा-केंद्रित, शाश्वत व सर्वसमावेशक दृष्टिकोनाला चालना दिली जात आहे. हा नवीन उपक्रम कंपनीची जेण्डर-न्यूट्रल उत्पादन श्रेणी आणि वैविध्यपूर्ण कर्मचारीवर्गापलीकडे द बॉडी शॉपच्या सर्वसमावेशकतेचा विस्तार करतो.
द बॉडी शॉप दक्षिण आशियाच्या मुख्य ब्रँड अधिकारी हरमीत सिंग आपले मत व्यक्त करत म्हणाल्या, आम्हाला मुंबईतील आमच्या अॅक्टिव्हीस्ट वर्कशॉप स्टोअरमध्ये ब्रेलचा समावेश करण्याची घोषणा करताना आनंद होत आहे आणि ही घोषणा भारतातील आमच्या 18व्या वर्धापन दिन साजरीकरणाशी संलग्न आहे. सर्वसमोवशक नियुक्तीपासून ब्रेलच्या समावेशापर्यंत आम्ही एथिकल ब्युटी उपलब्ध करून देत आहोत. आमचा सर्वांसाठी सर्वसमावेशक इन-स्टोअर अनुभवांची खात्री घेण्याचा मनुसबा आहे, जे द बॉडी शॉपच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे.