पंडित पाटील, चित्रा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
भाकरवड | वार्ताहर |
पोयनाड बाजारपेठ येथे शनिवारी 21 ऑगस्ट आयआयएफएल फ़ायनन्स लि. च्या शाखेचे उद्घाटन माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्या चित्रा पाटील, पोयनाड सरपंच शकुंतला काकडे,माजी सरपंच भूषण चवरकर,व्यापारी असोचेे अध्यक्ष प्रकाश जैन,सदस्य कल्पना राऊत, प्रमोद राऊत, विजेन्द्र तावडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
आयआयएफएल ही ब्रँच पोयनाड येथे प्रथमच आल्याने ग्राहकांना गोल्ड लोन, बिझनेस लोन,मेडिकल लोन (आरोग्य विमा), टू व्हिलर लोन,फोर व्हिलर लोन, डिमॅट अकाउंट आदी गोष्टी सहजपणे उपलब्ध होणार आहेत.या ब्रँचच्या संपूर्ण भारतात अडीच हजार तर महाराष्ट्र मध्ये दोनशेहून अधिक शाखा आहेत. प्रत्येक जिल्हात तालुक्याच्या मध्यवर्ती सर्व ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती या ब्रॅच चे रिजनल हेड संतोष भोसले, टी.एम.जावेद, मुलाणी ,बँक मॅनेजर चैतन्य म्हात्रे मनिष म्हात्रे,ि मतेश टेमकर, तेजस्वीनी पाटील,स्वप्नाली सुतार,आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.