। पुणे । प्रतिनिधी ।
मांजरी खुर्द येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पाव विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकी सोडून तेथून पसार झाले. या हल्यात पाव विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. नसीम अब्बासी बसीर (वय 60, रा. हडपसर) असे जखमी झालेल्या पाव विक्रेत्याचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बशीर हे सुमारे वीस वर्षांपासून फिरून पाव विकण्याचे काम असून ते हडपसरहून मांजरीत पाव विकण्यासाठी येत असतात. असेच मंगळवारी ते पाव विकण्यासाठी आले असता, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला केला. त्यांनी मोठा आरडाओरडा केला असता ते तरुण दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी त्यांना दवाखान्यात नेले. या घटनेची माहिती मांजरीच्या पोलीस पाटलांनी वाघोली पोलिसांना दिली.






