पोकलेन मशीनसह ब्रेकरमशिनची चोरी

। पनवेल । वार्ताहर ।

पोकलेन मशीनसह ब्रेकर मशीनची चोरी तसेच दोन महिन्याचे पोकलेनचे भाडे असे मिळून एकूण 12 लाख 70 हजार रुपयांचंही फसवणूक झाल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे.

सतीश शिंदे यांच्या मालकीची पोकलेन मशीन हि तिघा जणांना भाड्याने लावण्यासाठी दिली होती. परंतु सदर त्रिकुटाने आपसात संगनमत करून ज्या साईटवर कामासाठी लावतो असे सांगून ते शिंदे यांना काही एक न सांगता परस्पर दुसर्‍या साईटवर त्या मशीनचा वापर करून सदर मशीन परस्पर कोणाला तरी विक्री करून त्याचप्रमाणे ठरल्याप्रमाणे भाडे न देता एकूण 12 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version