ब्रेकिंग: राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू उमेदवारी अर्ज भरणार

। मुंबई । प्रतिनिधी ।
झारखंडच्या माजी राज्यपाल आणि एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह एनडीएचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती पदाची उमेदवारी म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नामनिर्देशन पत्रावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी स्वाक्षरी करण्यात आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जातील पहिले प्रस्तावक ठरले आहेत. त्यांनी ट्वीट करत म्हटलंय की, हे माझं भाग्य आहे की, भारतातील आदिवासी समाजातील पहिल्या आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन पत्रावर स्वाक्षरी करण्याची संधी मला मिळाली.

Exit mobile version