ब्रेकिंग! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; बिश्नोई गँगचा हात

| मुंबई | प्रतिनिधी |

रविवारी पहाटे झालेल्या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास सुरु असून या संदर्भात आता नवीन अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थाना बाहेर गोळीबार झाला. गोळीबारात घरात घुसल्याची माहिती समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. बाईक वरून आलेल्या दोन अज्ञातांनी केलं आणि पळ काढला. या प्रकरणी फॉरेन्सिक टीम, पोलीस, मुंबई गुन्हा शाखेकडून तपास सुरु आहे. पोलीस यंत्रणा अलर्टवर आहेत.

मुंबई पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या चार वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत. सलमान खान गोळीबार प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे देण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, या गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता आहे. सलमान खान कुटुंबियांना मागील काही काळात बिश्नोई गँगकडून धमक्या येत होत्या. पत्र आणि ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यामुळे आता झालेल्या गोळीबाराचं संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना सुरक्षे संदर्भात दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली असल्याची देखील माहिती मिळत आहे.

फडणवीसांची प्रतिक्रिया…
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांच्या तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार, नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
संजय राऊतांची टीका…
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली असून, गृहमंत्री राजकारणात व्यस्त आहेत. तसेच सत्तधारी पक्षातील चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस पोलीस संरक्षण देण्यात येत आहे, असे राऊत म्हणाले.
Exit mobile version