अवकाळीमुळे वीट व्यवसाय चिंताग्रस्त

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

वातावरण बदलाचा फटका विट व्यवसायापासून ते पालेभाज्या ते फळ लागवड करीत असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा बसला आहे. दोन दिवसांपुर्वी सायंकाळी येत असलेल्या अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे आपल्या कच्च्या विट वाचविण्यासाठी व्यवसायिकांची तारांबळ उडाली. विटांचे नुकसान होउ नये यासाठी कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्लॅस्टिक टाकण्यात आले. मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस केव्हा बरसेल याची काही शास्वती नाही. यामुळे वीटभट्टी मालकांचे अधिक मोठे नुकसान होणार या भीतीपोटी सायंकाळ होताच कच्च्या वीटा वाचविण्यासाठी वीटभट्टी मालकांची तारांबळ उडाली. एकंदरीत अवकाळीमुळे व्यवसायांकाची मोठी हानी झाल्यामुळे चिंताग्रस्त झाले आहे.

Exit mobile version