नेहुलीत नवऱ्या मुलीने बजावला मतदानाचा हक्क
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली असून अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील एका नवऱ्या मुलीने लग्नाच्या गडबडीतही मतदानाचा हक्क बजावला. लग्न घाई असतानाही ‘आधी मतदान, मग लग्न’ या भूमिकेतून मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावे, असा संदेश मानसी शशिकांत घरत हिने तिच्या कृतीतून दिला.







