| लखनौ | वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या मुलाच्या ताफ्याताली फॉर्च्युनर कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. खासदारपुत्राच्या ताफ्यातील युपी-एच-डब्लू -1800 या व्हाइट रंगाच्या फॉर्च्युनर कारने तिघांना धडक दिली.
ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या मुलाच्या ताफ्यातील कारने भरधाव वेगात तिघांना उडवले. त्यामध्ये, दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. करण ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे उत्तर प्रदेशातील उमेदवार आहेत. कुस्तीपटू महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप करत खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरुद्ध आंदोलन छेडले होते. त्यांनतर, देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी, न्यायालयाच्या आदेशान्वये ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर, भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून त्यांच्या मुलास उमेदवारी दिली. त्याच उमेदवार असलेल्या त्यांच्या मुलाने दोघांना कारखाली चिरडले आहे.