। कोर्लई । वार्ताहर ।
मुंबई येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ओकिनावा शोरीन रियु कराटे डो, उडेन टी कोबुजूत्सु असो. रायगडच्या कराटेपट्टूंनी 3 रजत, 10 कांस्यपदके मिळवून चमकदार कामगिरी केली आहे.
ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर आणि महाराष्ट्र अम्यॅचुअर स्पोर्ट्स कराटे असो. यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील दादर येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राज्यभरातील अनेक कराटे संघटनांनी भाग घेतला होता. रायगड जिल्ह्यातील रसायनी व मजगाव-नांदगाव येथील शोरीन रियु कराटे डोच्या कराटेपट्टूंनी या स्पर्धेत एकूण 13 पदकांची कमाई केली आहे. त्यात शांभवी सावंत, त्रीशा गट्टू, खूशी शेटे यांनी रजत पदक पटकावले असून शर्वरी तांबडकर, ईश्वरी तांबडकर, स्वरूप जांभळे, आरंभ गणतांडेल, सई पाटील, वैदहि कुलकर्णी, अंश गहिरे, रेश्मा भोईर, काव्या नाक्ती आणि आर्यन गद्रे यांनी कांस्यपदके पटकावली आहेत.
या सर्व कराटेपट्टूंना आंतरराष्ट्रीय पंच क्योशी विजय तांबडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षक रेन्शी अभिषेक तांबडकर व सेन्सई आकांक्षा तांबडकर, सेंम्पाय स्वप्ना तांबडकर यांचे मार्गदर्शन लाभले. रायगडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत मिळविलेल्या यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र कौतुक होत आहे.