कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; 24 तासात लावला गुन्ह्याचा छडा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातील आमराई परिसरात असलेल्या राजनोव्ह सिनेमा गृहातील किंमती वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली. साधारण 5 लाख 82 हजाराच्या मालाची चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. कर्जत पोलिसांच्या या कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये आमराई परीसरातील राजनोवा थिएटरचा छताचा दरवाजा तोडून (दि.10) ते (दि.19) जून रोजी चोरीची घटना घडली होती. दरम्यान थिएटरमधील डॉल्बी साउंड बॉक्स, ॲम्प्लिफायर व इतर सामानाची चोरी आणि घरफोडी करून पसार झालेबाबत राजनोवा थियटरचे मालक यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कर्जत पोलीस ठाण्यात सात जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे आणि पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक निर्माण करण्यात आले होते. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सतिष शिंदे, पोलीस हवालदार समिर भोईर, स्वप्नील येरूणकर, अनिल वडते, पोलीस नाईक संतोष साळुंखे, केशव नागरगोजे, पोलीस शिपाई गणेश पाटील, भरत पावरा, आकाश राठोड, संतोष, रोहित खरात, रविंद्र लोहकरे यांची वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला होता.

या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक पुरावे आणि गोपनिय बातमीदाराच्या मदतीने गुन्हयातील आरोपींना गुन्हा दाखल झाल्यापासून 12 तासाच्या आत अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींकडून चोरीस गेलेले दहा डॉल्बी स्पीकर, आठ ॲमप्लीफायर स्पीकर, एक बास मॅनेजमेंट मशीन असे सर्व साहित्य हस्तगत करण्यात आले. या सर्व मुद्देमाल ची किमंत साधारण 5 लाख 82 हजार इतकी असून कर्जत पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version