| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमधील रोलर स्केटिंगपटू विनीत जाधव याने नॅशनल चॅम्पियनशिप 2023 स्पर्धे चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नुकतेच खोपोली येथे रोलर ॲथेलेटिक्स महाराष्ट्र स्टेट स्केटिंग चॅम्पियनशीप 2023 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात विनीतने कौशल्यपूर्ण रोलर स्केटिंग खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली.
विनीत जाधव पनवेलमधील टी 75 रोलर स्केटिंग क्लबमध्ये महाराष्ट्र संघाचे कर्णधार प्रसाद ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. विनीतच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पनवेलची स्केटिंगपटू तुर्या नाईक हिचीदेखील महाराष्ट्र संघात निवड झाली असून, तिच्यापाठोपाठ विनीतने महाराष्ट्राच्या संघात स्थान निश्चित करुन पुन्हा एकदा पनवेलकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.







