जर्मनी सरकारची घोषणा
। मुंबई । वार्ताहर ।
जर्मनीच्या आरोग्य व्यवस्थापनाने शनिवारी दि. 18 डिसेंबर रोजी रात्री घोषित केलं की आता ब्रिटनचाही समावेश हाय रिस्क देशांच्या यादीत करण्यात येत आहे. म्हणजेच जर्मनीमध्ये आता ब्रिटनमधून येणार्या प्रवाशांवरही कठोर बंधनं लादण्यात येणार आहेत. ब्रिटीश राजधानी असलेल्या लंडनचे मेयर सादिक खान यांनी परिसरातला ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता ही गंभीर बाब असल्याचं सांगत त्या परिस्थितीला चिंताजनक घोषित केलं. या निर्णयामुळेच जर्मनी सरकारने ब्रिटनचा समावेश हाय रिस्क देशांच्या यादीत केला आहे. आज म्हणजेच रविवारी रात्रीपासून हा बदल लागू होणार आहे. म्हणजेच ब्रिटनमधून येणार्या प्रवाशांना दोन आठवड्यांचं विलगीकरण अनिवार्य असणार आहे. लस घेतलेल्यांना तसंच लस घेतलेल्यांना सर्वांनाच हा नियम लागू होणार असल्याची माहिती देशाच्या आरोग्य यंत्रणेने दिली. छऊढत ने यासंदर्भातील सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.