रायगडात भाऊबीजेचा उत्साह

। मळेघर । वार्ताहर ।
दिवाळीतील महत्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बुधवारी साजर्‍या होणार्‍या या सणाची तयारी सर्व घराघरामध्ये जोरात सुरु असून, बहिणीला ओवाळणी म्हणून विविध वस्तुंची खरेदी, विक्रीही बाजारात सुरु झालेली आहे. शिवाय बुधवारी भाऊबीज आल्याने लाडक्या भावाला चमचमीत मासांहार घालण्यासाठी भगिनीही सज्ज झाल्या आहेत.

आज भाऊबीजेचा दिवस, आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवसाला महत्त्व प्राप्त करून दिले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्याकरीता भावाच्या घरी जातो तर भाऊबीजेच्या दिवशी भाऊराया आपल्या बहिणीला भेटण्याकरीता भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या घरी जात असतो. त्यावेळी निस्वार्थी, प्रेमाच अतुट नात दृढ करण्याकरीता व जपण्याकरीता शास्त्रकारांनी हा दिवस बहिण-भावासाठी दिला आहे.

भाऊबीज म्हटली की भाऊरायाला जेवणासाठी जय्यत तयारी करण्यात येत असते, कधी शाकाहारीचा दिवस असला की नाराजी करण्यात येतो. मात्र मांसाहाराचा वार जुळून आला की मग मात्र आनंद व्यक्त होत असतो. आज भाऊबीजेचा दिवस मांसाहाराचा असून प्रत्येक घरात मटण, चिकन, मच्छीचा बेत आखण्यात आला आहे. यासाठी रायगडात हजारो मटण, चिकन विक्रेते सज्ज झाले आहेत. सध्या मटण बकरी 460, बोकड 680 तर चिकन 200 रुपये प्रतिकिलो भावानी विक्री होत आहे. मात्र आज होणार्‍या भाऊबीजेनिमित्त रायगडात हजारो कोंबड्या, बोकडांची कत्तल करून भाऊबीज साजरी होणार आहे त्याचबरोबर पेण खारेपाटातील स्थानिक मच्छी विक्रेते सज्ज झाले आहेत.

Exit mobile version