भाऊबीजेला वाहतूक कोंडीमुळे भाऊरायांचा हिरमोड

। नेरळ । वार्ताहर ।
परतीच्या पावसाचा फटका सलग दुसर्‍या दिवशी कर्जत तालुक्यातील भातशेती पिकाला बसला आहे. तर,भाऊबीजेला कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते वाहनांनी भरून गेले होते आणि त्याचा परिणाम शनिवारी दुपारपासून कर्जत चारफाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला वाहनचालक आणि प्रामुख्याने भाऊबीजसाठी घराबाहेर पडलेल्या भाऊरायांना बसला. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. शनिवारी भाऊबीजेचा दिवस असल्याने भाऊबीजेला जाणार्‍या बंधुरायांची एकच त्रेधा उडाली. शनिवार-रविवार असल्याने विकेंडसाठी कर्जत तालुक्यातील फार्म हाऊसवर येणारे पर्यटक यांच्या वाहनांमुळे मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.त्यामुळे भाऊबीजेला जाणार्‍या बंधुरायांचे वेळापत्रक कोलमडले. त्यातच संध्याकाळी परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावल्याने बंधुरायांचा हिरमोड झाला.

Exit mobile version