अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या

| ठाणे | वार्ताहर |

दहिसर परिसरातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक अत्याचार करण्यासाठी (दि.25) मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता मृत मुलाचे अपहरण करण्यात आले. राहत्या घरातून घेऊन जाऊन त्याचा नंतर खून करण्यात आला आहे. रमजान मृत मुलाला प्रलोभन दाखवून निर्जन स्थळी घेऊन गेला. तेथे आरोपींना मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने विरोध केल्यामुळे आरोपीने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याला बेशुद्ध केले आणि कपड्याने त्याचा गळा आवळला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. दोघांनीही मृत मुलाचे हात-पाय बांधून त्याला पाण्याच्या डबक्यात फेकून दिले. या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी रमजान मोहम्मद कुद्दूस शेख आणि मोहम्मद आझाद कुद्दुस शेख या दोन आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मृत मुलाच्या आईने शिळ डायघर पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रारदार महिलेचा मुलगा 12 वर्षीय मुलगा (दि.25)मार्च रोजी घरातून बाहेर पडला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो परतला नव्हता. या महिलेने पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दिली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी आपला तपास चालू केला. तपासादरम्यान हा मुलगा नवी मुंबई परिसरातील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतावस्थेत आढळला. मुलाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तक्रारदार महिलेशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. गुन्ह्यात अन्य कोणाचा समावेश आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Exit mobile version