माथेरानमघ्ये पर्यटक महिलेची निर्घृण हत्या; शीर नसलेला विवस्त्र मृतदेह सापडला

नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मध्ये पर्यटनास आलेल्या जोडप्यातील इसमाकडून त्याच्याबरोबर असलेल्या महिलेला शिरच्छेद करून धड तिथेच घटनास्थळी ठेऊन तिचे शीर घेऊन सदर इसम पसार झाला आहे. महिलेचे प्रेत निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले असून त्या जोडीने लॉज मध्ये प्वेश करताना मुस्लिम नावे नोंदवली होती. दरम्यान,रविवारी सकाळी लॉजमधील रुमबॉयने खोली साफ करण्याचा प्रयत्न केला असता त्याला बेडच्या खाली महिलेचा शीर नसलेला मृतदेह दिसला आणि नंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.
11 डिसेंबर रोजी पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान मध्ये एक तरुण जोडपे पर्यटनासाठी आले होते.सायंकाळी उशिरा दस्तुरी नाका येथील प्रवासी कर भरून हे जोडपे माथेरान येथील इंदिरानगर परिसरात असलेल्या खाजगी लॉजिंगमध्ये त्यांनी रूम घेतली.तेथील साईसदन लॉजमध्ये त्या जोडप्याला रूम देताना भरलेली माहितीनुसार त्या तरुणाचे नाव अमजद खान आणि तरुणीचे रुबिना बेन असे लिहिले होते,तर नोंदविलेला मोबाईल नंबर खोटा होता. माथेरान दस्तुरी नाका आंणि माथेरानमधील लोकवस्तीच्या मध्यभागी असलेल्या साई सदन मध्ये सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पोहचलेल्या त्या जोडप्याने माथेरानमध्ये बाहेर कुठेही जाऊन पर्यटन केले नाही. रविवारी सकाळी साडे दहा वाजता त्या लॉज मध्ये काम करणारा स्वच्छता कर्मचारी रूमची स्वच्छता करण्यासाठी पोहचला. रूम मध्ये सर्वत्र त्याला स्वच्छता दिसून आल्याने त्याला वाटले की जोडपे रूम सोडून गेले असावेत.मात्र काल जोडपे म्हणून आलेल्या त्या महिलेचा शिरच्छेद पलंगाखाली दिसून आला.
त्या महिलेच्या शरीराचे शीर तोडून टाकले होते आणि शीर त्या ठिकाणी नव्हते.अमजद खान हा त्या महिलेसोबत आलेल्या तरुणाने त्या दोघांची ओळख पटू नये यासाठी महिलेचे शीर तोडून टाकलेच,परंतु त्या महिलेच्या हातावर टॅटू काढला होता,त्यावरून त्या महिलेची ओळख पटू नये यासाठी त्या तरुणाने त्या महिलेच्या टॅटू काढलेल्या हाताच्या भागाचे लचके काढले होते.त्यात त्याने नोंदवहीत नोंदवलेली नावे हे खोटी असल्याने त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.महिलेचे सदर इसमाने शीर सोबत घेऊन गेल्याने घटनास्थळी फक्त धड ठेवून त्या महिले सोबत राहिलेल्या इसमाने आपली ओळख लपविण्याचा देखील प्रयत्न केला असून तेथील लॉजच्या नोंद वहीत महिलेचे नाव रुबिना बेन व तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीचे नाव अमजद खान अशी खोटी माहिती भरली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात येत आहे.या घटनेमुळे नेहमी शांत असणारे माथेरान पुरते हादरले आहे.
घटनेची माहिती माथेरान पोलिसांना सकाळी दहा वाजून 50 मिनिटांनी मिळाल्यानंतर माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बांगर आणि सर्व स्टाफ साई सदन इंदिरा नगर येथे पोहचला होता.त्यात इंदिरानगर येथील सर्व परिसरात नेहमी गाजवलेला असतो आणि त्यामुळे त्या तरुणाला शोधण्यात पोलिसांना लवकर यश आले पाहिजे रस्ताही जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी आपल्या पोलीस अधिकार्‍याना मार्गदर्शन आणि सूचना केल्या आहेत. त्यानुसार पोलीस उपाधीक्षक विजय लगारे,कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की,नेरळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि जिल्हा पोलीस यांच्या कडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि गुन्हे प्रकटीकरण यांची पथके तैनात करण्यात अली आहेत.


मृतदेह एमजीएम रुग्णालयात…
त्या महिलेचा शीर नसलेला मृतदेह ओळख पटण्यासाठी काही दिवस ठेवला जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.पनवेल कलम्बोली येथील एमजीएम हॉस्पिटल येथे कोल्ड स्टोरेंज मध्ये त्या महिलेचा मृतदेह ठेवण्यासाठी माथेरान येथून नेण्यात आला.

Exit mobile version