| मिरज | प्रतिनिधी |
होळकर चौकात पुर्वीच्या वादातून तरूणावर चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. सुमित जयवंत कांबळे (21) असे मृत तरूणाचे नाव आहे. रविवारी (दि. 2) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
संशयित सूरज आठवलेसह पाच साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे. पुर्वीच्या वादातूनच हा खून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुमित कांबळे हा खंडेराजुरीत कुटुंबासह राहतो. तो सध्या सैन्य दल भरतीची पुर्व तयारी करत होता. काही दिवसांपुर्वी खंडेराजुरीत झालेल्या मिरवणूकीत सुमित आणि संशयितांत वाद झाला होता. या वादाची धुसपुस कायम होती. काल रात्री सुमित चौकात थांबला होता. त्यावेळी संशयित आणि त्याच्यात पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयिताने चाकूने वार केले. त्यात सुमित चा मृत्यू झाला, मिरजेतील शासकीय रुग्णालयात काल रात्री उशीरा उत्तरीय सुमितची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. संशयित सूरज आठवलेसह काही जण ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण हत्या
