बीएसएनएलच्या नादुरुस्ती उपकरणांचा श्रीवर्धन-आगाराला फटका

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन-आगाराला भारतीय संचार निगम मर्यादित सेवेच्या दूरध्वनी उपकरणांची टंचाई याचा चांगलाच फटका बसला असून आगारात दोन व नियंत्रण कक्षात एक असे तीन दूरध्वनी असून, उपकरणे नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांनी आगारात दूरध्वनी केला असता विविध उत्तर ऐकावयास मिळतात. कर्मचार्‍यांचा संप मिटल्याने आगारातून लांब पल्ल्याच्या तसेच स्थानिक फेर्‍या पूर्ववत झाल्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक विचारण्यासाठी अथवा आगाऊ आरक्षणासंदर्भात प्रवाशांनी दूरध्वनीवर संपर्क केला असता नियंत्रण कक्षातून दूरध्वनी उचचला जातो. पण, संभाषण व्यवस्थित ऐकू येत नसल्यामुळे प्रवासी गोंधळून जातात.
श्रीवर्धन आगारप्रमुख तेजस गायकवाड यांनी सांगितले की, श्रीवर्धन येथील कार्यालयात दूरध्वनी उपकरणांची मागणी करूनसुद्धा उपकरणं मिळत नाहीत. नादुरुस्त उपकरणांमुळे आमच्या कामांना विलंब होत आहे.

गेल्या काही वर्षांत दूरध्वनीची मागणी घटल्यामुळे उपकरणांची उपलब्धता कमी झाली आहे. ग्राहकाला उपकरणाची आवश्यकता भासल्यास ग्राहक कार्यालयात न येता बाजारातून आपल्या आवडीची उपकरणे खरेदी करतात.

रोहित दातार, ज्युनिअर टेलिफोन ऑपरेटर, श्रीवर्धन

Exit mobile version