बुद्धविहार व्यवस्थापन कायदा जनसमर्थन अभियान

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

दि धम्म संहिता अ‍ॅक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने अ‍ॅड. दिलीप काकडे यांचे नेतृत्वाखाली राज्य बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे ही मागणी केली होती. ती शासनाने मान्य केली आहे. या संपूर्ण विषयाची बौद्ध समाजाला माहिती देण्यासाठी धम्म संहिता अ‍ॅक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय बुद्धविहार व्यवस्थापन कायदा जनसमर्थन अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानाच्या समन्वयाचे कार्य दादासाहेब मर्चंडे करीत आहेत. तर अ‍ॅड. दिलीप काकडे मार्गदर्शन करणार आहेत. या अभियानात बुद्ध विहार व्यवस्थापन कायद्याबाबत संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील बौद्ध समाजातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी होत आहे. रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील बौद्ध बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अ‍ॅड. दिलीप काकडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, श्रीवर्धन येथे हा कार्यक्रम झाला. प्रथम बुद्ध वंदना बौद्ध हितकारीणी सभा ता. श्रीवर्धनचे अध्यक्ष आयु. यशवंत भि. लोखंडे यांनी वंदना घेऊन संपन्न केली. सूत्रसंचालन अशोक सावंत यांनी केले. माजी सरचिटणीस चंद्रकांत हुंदिलकर, स्थानिक चिटणीस दिपक बा. शिर्के, कोषाध्यक्ष गौतम साखरे, उपाध्यक्ष मंगेश खैरे व मुकुंद जाधव, अशोक शिर्के, एकनाथ जाधव, एम.डी.पवार, नरेंद्र स.शिर्के, महिला उपाध्यक्षा उर्मिला वि.जाधव, कोषाध्यक्ष येलवे, अनुसया हुंबरकर, ज्योती जाधव, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, बौद्ध हितकारिणी सभा व भारतीय बौद्ध महासभा, ता. शाखा श्रीवर्धनचे अध्यक्ष संदीप जाधव या सर्वांनी उत्तम सहकार्य केले.

Exit mobile version