| तळा । वार्ताहर ।
तालुक्यातील चरई येथे बौद्धजन पंचायत समितीची सभा सदानंद येलवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तळा शहरात बौद्धपंचायत समितीतर्फे सभागृह बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यात आली आहे. या जागेवर सभागृह बांधण्यासाठी कशाप्रकारे निधी उपलब्ध होईल याबाबत ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हिराचंद तांबे, धनराज गायकवाड, अनंत मोरे, किशोर मोरे, यशवंत माळी, रामदास मोरे, यांसह सर्व पदाधिकारी तसेच खैराट महिला मंडळ, खांबोली महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







