Budget 2022: काय झालंय स्वस्त?

। मुंबई । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोनाचे संकट दोन वर्षांपासून ओढावलं असून अशा परिस्थितीत देशासह जागतिक अर्थव्यवस्थेसमोर यातून सावरण्याचे आव्हान आहे. अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी या अर्थसंकल्पात काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या क्षेत्राला दिलासा देणं आणि रोजगार निर्मितीचं आव्हानं केंद्र सरकारपुढे असणार आहे.

बजेट २०२२ मध्ये काय स्वस्त?
यावर्षीच्या अर्थसंकल्पानुसार मोबाईल, कपडे, कॅमेरा लेन्सेस, चामड्याच्या वस्तू, कृषी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स या वस्तूंच्या दरात घट होणार असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version