अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

विधिमंडळात सत्ताधारी, विरोधकांची सत्वपरीक्षा
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी (27 फेब्रुवारी) सुरु होत आहे.राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती,पोटनिवडणुकीची धामधूम अशा हे अधिवेशन होत आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार कलगीतुरा पहावयास मिळणार आहे.सत्ताधारी शिंदे,फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्पही 28 फेब्रुवारीला सादर होणार आहे.याबाबतही सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

शिंदे,फडणवीस सरकारचे हे तिसरे अधिवेशन होय.या कालावधीत राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती,शिवसेनेचे झालेले विभाजन याचे पडसाद या अधिवेशनात जोरदारपणे उमटण्याची शक्यता वर्तविली आहे.त्यातच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकालही 2 मार्चला लागणार आहेत.त्याचाही परिणाम अधिवेशन काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी,आरोप,प्रत्यारोप,घोषणाबाजी आदी प्रकार यावेळीही जनतेला पहावयास मिळणार हे नक्की.

सरकारी चहामध्ये सोन्याचा अर्क
अजित पवारांची खोचक टीका

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना आणि टीका केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी सरकारकडून जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जात आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या निधीचे वितरण झालेले नाही. आर्थिक वर्ष संपत आले. त्यामुळे हा निधी परत जणार आहे, अशी टीका केली आहे. तसेच मागील चार महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील 2 38 लाख रुपये आले आहे. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक सवालही अजित पवार यांनी केला आहे.
विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. एक महिना तीन दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले, याची माहिती काढावी. अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. निधीचे वितरण नाहीये. सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवारांचा हल्लाबोल
पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला आहे.
रविवारी विधीमंडळातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे नेते रायपूर येथे शिबीर असल्याने उपस्थित राहिले नाहीत मात्र बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चर्चा करुन झालेल्या निर्णयाला पाठिंबा दिला अशी माहिती सुरुवातीलाच अजित पवार यांनी दिली. यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब, मुख्य अनिल पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आ.कपिल पाटील, आ. विनोद निकोले, आ.सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

Exit mobile version